सकाळ डिजिटल टीम
२४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान सौदी अरेबीयातील जेद्दाह येथे पार पडला. या ५७७ लोकांपैकी लिलावात १८२ खेळाडूंवर ६३९. १५ कोटी रूपये खर्च करण्यात आले.
आयपीएल २०२५ लिलावातील अनसोल्ड खेळाडूंचा संघ जाणून घेऊयात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नियुक्ती घेतलेला डेव्हिड वॉर्नर या लिलावात अनसोल्ड राहिला. वॉर्नरच्या नेतृत्वात २०१६ साली SRH संघ आयपीएल विजेता ठरला होता.
या लिलावात पृथ्वी शॉने आपली मूळ किंमत अवघी ७५ लाख रुपये ठेवली होती, तरीही तो या लिलावात अनसोल्ड राहिला.
मूळ किंमत १ कोटी असलेल्या मयंक अगरवाल या लिलावात सर्व फ्रॅंचायझींकडून दुर्लक्षित राहिला.
मागच्या हंगामात पंजाब किंग्ज संघाकडून खेळलेला इंग्लिश क्रिकेटपटू जॉनी बेअरस्टो या लिलावात अनसोल्ड राहिला.
आयपीएल २०२४ हंगामात तब्बल १४ कोटी रूपये बोली लागलेला डॅरी मिचेल या लिलावात अनसोल्ड राहिला.
भारतीय कसोटीपटू सरफराज खानवरही या लिलावात कोणत्याही फ्रॅंचायझीने बोली लावली नाही.
बडोदा संघातील अष्टपैलू खेळाडू अतित शेठने अनकॅप्ड खेळाडू म्हणून त्याने या लिलावात आपले नाव नोंदवले होते, पण तो या लिलावात अनसोल्ड राहिला.
आयपीलमध्ये १० कोटींपेक्षा जास्त किंमतीला विकला गेलेला शार्दुल ठाकूर या लिलावात अनसोल्ड राहिला.
मागच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या पियूष चावलाला या लिलावात कोणत्याही फ्रॅंचायझीने करारबद्ध केले नाही.
आयपीएलमध्ये एकूण १४४ विकेट्स घेणारा ३७ वर्षीय वेगवान गोलंदाज उमेश यादव या लिलावात अनसोल्ड राहिला.
मागील हंगामात सीएसकेसाठी ९ सामन्यांत १४ विकेट्स घेणाऱ्या मुस्तफिझूर रहमानवर या लिलावात कोणीही बोली लावली नाही.