सेम टू सेम! KKR च्या वैभव अरोराचा टॅटू माझ्यासारखाच, महिला खेळाडूची पोस्ट चर्चेत

Pranali Kodre

IPL

इंडियन प्रीमियर लीगमध्ये जगभरातून क्रिकेटपटू सामील होत असतात. त्यामुळे या स्पर्धेकडे सर्वांचे लक्षही असते.

Vaibhav Arora | Instagram

स्टाईल

अशात काही खेळाडूंच्या स्टाईलचीही बरीच चर्चा होते. काही खेळाडूंचे स्पेशल टॅटूही चर्चेत येतात.

Vaibhav Arora | Instagram

टॅटू

असाच कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू वैभव अरोराचा टॅटू चर्चेचा विषय ठरत आहे. याला कारण ठरली आहे ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू अमंडा जेड वेलिंग्टन.

Amanda Jade Wellington | Instagram

सारखा टॅटू

अमंडा जेड वेलिंग्टननेही तिच्या शरिरावर काही टॅटू काढले आहेत. तिचा एक टॅटू वैभव अरोराच्या टॅट्यूसारखाच असल्याचे तिच्या लक्षात आले आहे.

Amanda Jade Wellington | Instagram

हातावर टॅटू

वैभव अरोराच्या डाव्या हातावर आडव्या आणि उभ्या रेषेत काहीतरी लिहिलेला एक टॅटू आहे. तसाच अगदी सारखाच टॅटू अमंडाच्या उजव्या हातावर आहे.

Vaibhav Arora tattoo | Instagram

अमंडाची पोस्ट

हे लक्षात येताच अमंडाने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत लिहिले की 'माझ्या नुकतंच लक्षात आलं की कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या वैभवच्या हातावरही माझ्यासारखाच टॅटू आहे.'तिच्या या पोस्टनंतर त्यांच्या टॅटूची चर्चा होत आहे.

Amanda Jade Wellington and Vaibhav Arora Similar tattoo | Instagram

वैभव अरोराचे टॅटू

दरम्यान, वैभवच्या हातावर आणखीही काही टॅटू आहेत.

Vaibhav Arora | Instagram

IPL मध्ये खेळलेले सर्वात वयस्कर ५ खेळाडू

MS Dhoni | Sakal
येथे क्लिक करा