Pranali Kodre
इंडियन्स प्रीमियर लीगमध्ये जगातील कानाकोपऱ्यातील खेळाडूंना संधी मिळते. त्यामुळे या स्पर्धेत अगदी १३ वर्षांपासून ते चाळीपर्यंचे खेळाडू खेळताना दिसतात.
आयपीएलमध्ये खेळलेले आत्तापर्यंचे सर्वात वयस्कर ५ खेळाडू माहित आहेत का? चला जाणून घेऊ.
दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज इम्रान ताहीर जेव्हा शेवटचा आयपीएल सामना २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळला, तेव्हा त्याचे वय ४२ वर्षे २९ दिवस होते.
दिग्गद मुथय्या मुरलीधरन आयपीएलमध्ये शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी २०१४ साली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला, त्यावेळी त्याचे वय ४२ वर्षे ३५ दिवस होते.
चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी अद्यापही आयपीएल खेळत आहे. त्यामुळे ३० मार्चदरम्यान त्याचे वय ४३ वर्षे २६६ दिवस आहे. जसे तो पुढे खेळेल, तर त्याचे वयही वाढलेले असले.
वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या प्रवीण तांबेने गुजरात लायन्ससाठी २०१६ साली अखेरचा आयपीएल सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळला. त्यावेळी त्याचे वय ४४ वर्षे २१९ दिवस होते.
ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रॅड हॉग आयपीएलमध्ये २०१६ साली कोलकाता नाईट रायडर्सकडून गुजरात लायन्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला, त्यावेळी त्याचे वय ४५ वर्षे ९२ दिवस होते. तो आयपीएल खेळलेला सर्वात वयस्कर खेळाडू आहे.