सूरज यादव
आयपीएलच्या १८ व्या हंगामात अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सला हरवून पहिल्यांदाच आय़पीएलचं विजेतेपद पटकावलं. आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाबला ६ धावांनी हरवलं.
आरसीबीने विजेतेपद पटकावलं असलं तरी यंदाचा मालिकावीर म्हणजेच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव ठरला. त्यानं १५ सामन्यात प्रत्येक डावात २५ पेक्षा जास्त धावा केल्या.
अंतिम सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार कृ़णाल पांड्याने पटकावला. त्यानं जबरदस्त गोलंदाजी करत दोन विकेट घेतल्या.
गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने ऑरेंज कॅप पटकावली. त्यानं १५ डावात ७५९ धावा केल्या.
गुजरात टायटन्सच्याच प्रसिद्ध कृष्णाने पर्पल कॅप पटकावली. त्यानं यंदाच्या हंगामात सर्वाधिक २५ विकेट घेतल्या.
ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या साई सुदर्शनने इमर्जिंग प्लेअर ऑफ द सिजनचा पुरस्कार मिळवला. यंदाच्या हंगामात त्यानं सर्वाधिक चौकारही मारले आहेत.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार निकोलस पूरनने मारले. त्यानं एकूण ४० षटकार या हंगामात मारले.
कॅच ऑफ द सीजनचा पुरस्कार कामिंदू मेंडिसला मिळाला. तर सर्वाधिक स्ट्राइक रेटचा पुरस्कार वैभव सुर्यवंशीने पटकावला.
फेअर प्ले अवॉर्ड चेन्नई सुपर किंग्सला देण्यात आला. यंदाच्या हंगामात चेन्नई साखळी फेरीतच बाहेर पडले. पॉइंट टेबलमध्ये ते दहाव्या स्थानी होते.