Shubham Banubakode
आयपीएल २०२५ मध्ये पंचांनी दिलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. यामुळे अनेक सामन्यांना कलाटणी मिळाली आहे.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात डेवॉल्ड ब्रेव्हिसची विकेट वादग्रस्त ठरली. १५ सेकंदांत डीआरएस न घेतल्याने तो बाद झाला. रीप्लेमध्ये तो बाद नसल्याचे दिसून आले.
६ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या सामन्यात अनिकेत वर्माने वॉशिंग्टन सुंदरचा झेल घेतला, पण चेंडू जमिनीला लागला होता. तरीही थर्ड पंचाने त्याला बाद ठरवले. यामुळे वाद निर्माण झाला.
२५ एप्रिल २०२५ रोजी ध्रुव जुरेलला क्रुणाल पंड्याच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आउट देण्यात आले. पण रीप्लेमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे दिसले. या निर्णयामुळेही वाद झाला.
एलएसजी-डीसी सामन्यात पंचाने नो-बॉलकडे दुर्लक्ष केले. रीप्लेमध्ये नो-बॉल स्पष्ट दिसत होती. याचा सामन्यावर थेट परिणाम झाला.
१ मे २०२५ रोजी झालेल्या सामन्यात रोहित शर्माने १५ सेकंदांनंतर डीआरएस घेतला. पण पंचाने त्याची मागणी मान्य केली. यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
२३ मार्च २०२५ रोजी झालेल्या सामन्यात रियान पराग ४ धावांवर कॅच आउट झाला. पण चेंडू नो-बॉल असल्याचे दिसले. तरीही पंचाने तो तपासला नाही.
२ मे २०२५ रोजी झालेल्या सामन्यात शुभमन गिलला रन-आउट देण्यात आले. पण रीप्लेमध्ये स्टंपला चेंडू न लागता किपरचा हात लागल्याचे दिसले.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजाने अपील करण्यापूर्वीच पंचाने इशान किशनला बाद ठरवले. यामुळे मोठा वाद निर्माण झाला.