IPL 2025 सुरु होतेय; पण 'हे' स्टार मात्र पहिल्या टप्प्यात असतील मैदानाबाहेरच

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलची उत्सुकता

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदाचा जल्लोष संपत नाही तोच आता आयपीएलची उत्सुकता शिगेला पोचू लागली आहे.

IPL | Sakal

कधी सुरु होणार आयपीएल?

आयपीएलचे यंदा १८ वे वर्ष आहे. यंदा स्पर्धा २२ मार्चपासून सुरु होणार आहे.

IPL | Sakal

हे स्टार स्पर्धेबाहेर

दुखापत किंवा अन्य कारणांनी अनेक संघांमधील महत्त्वाचे खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळणार नाहीत. पाहा यात कोण-कोण आहे.

Hardik Pandya | Jasprit Bumrah | Sakal

मयांक यादव (लखनौ)

लखनौ सुपर जाएंट्सचा वेगवान गोलंदाज मयांक यादव दुखापतीमुळे स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळू शकणार नाही.

Mayank Yadav | Sakal

जोश हेझलवूड (बंगळूर)

तब्बल १२.५० कोटी रुपयांना करारबद्ध केलेल्या जोश हेझलवूडला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचं खेळणं अजूनही अनिश्चित आहे.

Josh Hazlewood | Sakal

जसप्रित बुमराह (मुंबई)

ऑस्ट्रेलियात झालेल्या दुखापतीतून जसप्रित बुमराह अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे किमान पहिले दोन आठवडे तो खेळणार नाही.

Jasprit Bumrah | Sakal

हार्दिक पांड्या (मुंबई)

गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये षटकांच्या संथ गतीमुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला यंदाच्या पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे.

Hardik Pandya | Sakal

मिचेल मार्श (लखनौ)

ऑस्ट्रेलियाचा ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार मिचेल मार्श पाठदुखीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो संघाबाहेर बसण्याची शक्यता आहे. तसेच तो या हंगामात फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे.

Mitchell Marsh | Sakal

IPL 2025: विराट कोहली RCB च्या ताफ्यात दाखल

Virat Kohli | RCB | Sakal
येथे क्लिक करा