सकाळ डिजिटल टीम
आगामी आयपीएल हंगामासाठी सर्व संघ व खेळाडू तयारीला लागले आहेत.
आशात आयीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंनाही आता खेळण्याची संधी निर्माण झाली आहे.
बीसीसीआयच्या नियमानुसार अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंना फ्रॅंचायझीज इंजुरी रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून संघात सामील करू शकतात.
या इंजुरी रिप्लेसमेंट खेळाडूंमध्ये टॉप ४ खेळाडू कोण असतील जाणून घेऊयात.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या दमदार फॉर्ममध्ये असलेला अष्टपैलू शार्दुल ठाकूर फ्रॅंचायझींसाठी पहिली पसंती असेल.
भारताचा प्रतिभावान खेळडू मानला जाणारा पृथ्वी श्वॉला फ्रॅंचायझी रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून संघात सामील करू शकतात.
देशांर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारा व अनुभवी फलंदाज मयंक अगरवालला खेळण्याची संधी मिळू शकते.
मागील आयपीएल हंगामांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उमेश यादवला फ्रॅंचायझी संधी देऊ शकतात.