सकाळ डिजिटल टीम
भारताचा ट्वेंटी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव क्रिकेटमधील फिटेस्ट (तंदुरूस्त) खेळाडूंपैकी एक आहे.
त्याची फिटनेस चांगली असून, तो मैदानावर नेहमीच अॅक्टीव्ह असतो.
चांगल्या फिटनेससाठी व्यायामासोबतच चांगल्या आहाराची देखील गरज असते.
भारतीय कर्णधाराच्या आहाराचे नियजोयन डाएटीशन श्वेता भाटीया करते.
श्वेता भाटीया खूप काळापासून सूर्यकुमार यादवसोबत फिटनेसवर काम करत आहे.
श्वेताने सांगितल्याप्रमाणे सूर्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी चहा, कॉफी, मिठाई यांसारखे गोड पदार्थ खात नाही.
सुर्याच्या डेली डाएटमध्ये प्रामुख्याने चपाती आणि भाताचा समावेश असतो.
त्याचप्रमाणे सूर्याच्या डाएटमध्ये अंडी, मटण, मासे यांसारख्या मांसाहारी पदार्थांचा देखील समावेश असतो.
सर्या चांगली फिटनेस राखण्यासाठी जिमसोबतच फुटबॉल व स्विमिंग करतो.