Pranali Kodre
आयपीएल २०२५ मध्ये १९ मे रोजी लखनौ सुपर जायंट्सला सनरायझर्स हैदराबादने ६ विकेट्सने पराभूत केले.
या पराभवामुळे लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.
यंदाच्या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा तो पाचवा संघ ठरला.
दरम्यान, सामना सुरू असताना एक मजेशीर पोस्टर कॅमेऱ्यात कैद झाले. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या पोस्टरवर लिहिले होते की 'मुलीकडचे म्हणतायेत लखनौ जोपर्यंत आयपीएल जिंकणार नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही.'
मात्र, लखनौ या सामन्यात पराभूत झाल्यानंतर त्यांचे आव्हानही स्पर्धेतून संपले, त्यामुळे यावर्षीतरी त्यांना विजेतेपदाची संधी नाही.
त्यामुळे त्या पोस्टरवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कारण आता लखनौला विजेतेपदासाठी प्रयत्न करण्यासाठी पुढच्या आयपीएल हंगामाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.