Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असून प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारे ३ संघ निश्चित झाले आहेत.
या तीन संघांमध्ये गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स संघ आहेत.
दरम्यान आत्तापर्यंत (१९ मे २०२५ पर्यंत) आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वाधिकवेळा स्थान मिळवणाऱ्या ५ संघांबद्दल जाणून घेऊ.
पहिले आयपीएल चॅम्पियन राजस्थान रॉयल्सने आत्तापर्यंत ६ वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
२०१६ साली आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने ७ वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
तीनवेळचे आयपीएलविजेते कोलकाता नाईट रायडर्सने ८ वेळा आयपीएळ प्लेऑफ गाठली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदा प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची ही १० वी वेळ होती.
५ वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सनेही आत्तापर्यंत १० वेळा आयपीएल प्लेऑफ गाठली आहे. आता त्यांना यंदाही प्लेऑफची संधी आहे, जर त्यांनी यावेळी प्लेऑफ गाठली, तर ही त्यांची ११ वी वेळ असेल.
५ वेळचे आयपीएल विजेते चेन्नई सुपर किंग्स या यादीत अव्वल क्रमांकावर असून त्यांनी १२ वेळा आयपीएल प्लेऑफची पात्रता मिळवली आहे.