Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेत २७ मार्च रोजी सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात झाला.
या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच घरच्या मैदानात ५ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.
लखनौच्या विजयात शार्दुल ठाकूरने मोलाचा वाटा उचलला. त्याने ४ षटकात ३४ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या.
त्याने लखनौने खेळलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्याही पहिल्या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या होत्या.
त्यामुळे आयपीएल २०२५ मधील सातव्या सामन्यानंतर शार्दुलने ६ विकेट्ससह सर्वाधिक विकेट्ससाठी दिली जाणारी पर्पल कॅपही पटकावली आहे.
विशेष म्हणजे शार्दुलला आयपीएल २०२५ लिलावात कोणीही खरेदी केले नव्हते. तो अनसोल्ड राहिला होता.
मात्र लखनौचा मोहसिन खान दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर झाला. त्यामुळे त्याचा बदली खेळाडू म्हणून लखनौने शार्दुलसोबत करार केला.
शार्दुलनेही या संधीचा फायदा घेत सुरुवातीलाच पर्पल कॅपसाठी दावेदारी ठोकली आहे.