Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे जूनपर्यंत तरी भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही.
यामुळे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरलाही मोठा कालावधी विश्रांतीसाठी मिळाला आहे.
या दरम्यान गंभीर युरोपमध्ये फिरायला गेला आहे.
त्याने पत्नी नताशा आणि त्याच्या दोन मुलींसह फ्रान्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
त्याच्या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सही आल्या आहेत.
गंभीरच्या नेतृत्वात भारतीय संघाने ९ मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकली.
यानंतर गंभीरला आता साधारण अडीच महिन्यांसाठी रिकामा वेळ मिळाला आहे, जो तो सध्या त्याच्या कुटुंबासमवेत व्यतीत करत आहे.