सकाळ डिजिटल टीम
मुंबई इंडियन्सचा पहिला सामने २३ मार्चला चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे.
३१ मार्चला मुंबई इंडियन्स त्यांच्या घरच्या मैदानावरील पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळेल.
मुंबई इंडियन्सला मागील पर्वात चांगली कामगिरी करता आलेली नाही, तरीही हार्दिक पांड्या यंदा नेतृत्व करणार आहे
अन्य ९ संघांप्रमाणे मुंबई इंडियन्सचेही १४ सामने होणार आहेत, यापैकी ७ वानखेडे स्टेडियमवर होतील.
मुंबई इंडियन्सच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे आणि त्यासाठी MI Family ने मेंबरशीप प्लॅन ठेवले आहेत
गोल्ड, सिलव्हर आणि ज्युनियर असे तीन प्लॅन मुंबई इंडियन्सने दिले आहेत. यांना तिकीट विक्रित प्राधान्य मिळणार आहे
पहिल्या फेरीच्या तिकीट विक्रिच्या नोंदणीला ३ मार्चपासून सुरूवात झाली आणि Book My Show वर ती करता येणार आहे
सहा मार्चपासून तिकीट विक्रिला सुरुवात होणार आहे. ९९९ रुपयांपासून तिकिटीची किंमत आहे.