Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होत आहे. हा आयपीएलचा १८ वा हंगाम असणार आहे.
२२ मार्च रोजी कोलकातामधील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पहिला सामना खेळवला जाणार आहे.
या सामन्याआधी आयपीएल २०२५ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
यावेळीच्या उद्घाटन सोहळ्यातही अनेक बॉलीवूड स्टार झळकणार आहेत.
मिडिया रिपोर्ट्सनुसार श्रद्धा कपूर आणि वरुण धवन या सोहळ्यात थिरकताना दिसणार आहेत. याशिवाय दिशा पटानीच्या नावाचीही चर्चा आहे.
गेल्यावेळीप्रमाणे यंदाही अरजीत सिंगच्या गाण्यांची मेजवाणी प्रेक्षकांना य़ा उद्घाटन सोहळ्यात ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय काही रिपोर्ट्सनुसार गायिका श्रेया घोषालही या सोहळ्यात दिसणार आहे.
दरम्यान, अद्याप आयपीएल मॅनेजमेंटकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.