Pranali Kodre
विराट कोहली हा जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक मानला जातो.
त्याने नुकतेच RCB इनोव्हेशन लॅब इंडियन स्पोर्ट्स समिटमध्ये त्याच्या तंदुरुस्तीबाबत भाष्य केले.
मात्र, विराट कोहली याने या वेळी स्वत:च्या तंदुरुस्तीबाबत आई नाराज असल्याचे सांगितले.
आईला तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देणे आव्हानात्मक असल्याचेही त्याच्याकडून सांगण्यात आले.
विराट कोहली सांगतो की, माझ्या तंदुरुस्तीवर आई नेहमी नाराज असते. ती म्हणते की पराठा खात नाहीस. मैदानावर तू अशक्त दिसत आहेस.
त्यावर मी तिला म्हणतो की, परदेशातील खेळाडू मला तंदुरुस्तीबाबत विचारणा करतात आणि तू म्हणतेस की मी अशक्त झालो आहे.
मी आजारी नाही. तू काळजी करू नकोस, असे सांगून आईला मनवण्याचा प्रयत्न करतो.