Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात म्हणजेच ७० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सला ६ विकेट्सने पराभूत केले.
या सामन्यानंतर आता साखळी सामने संपले असल्याने पाँइंट्स टेबलमधील सर्व १० स्थानावर कोणता संघ यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
चेन्नई सुपर किंग्स सर्वात शेवटच्या १० व्या क्रमांकावर असून १४ सामन्यांत ४ विजय मिळवले आहेत आणि १० पराभव स्वीकारले आहेत. त्यांचा -०.६४७ नेट रन रेट असून त्यांमी ८ गुण मिळवले आहेत.
राजस्थान रॉयल्स ९ व्या क्रमांकावर असून त्यांनी १४ सामन्यांत ४ विजय मिळवले आहेत आणि १० पराभव स्वीकारले आहेत. राजस्थानचा नेट रन रेट -०.५४९ असा असून त्यांचेही ८ गुण आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स १४ सामन्यांमध्ये ५ विजय आणि ७ पराभव स्वीकारले असून २ सामने पावसामुळे रद्द झाले. त्यांचा -०.३०५ नेट रन रेट असून १२ गुण आहेत.
सातव्या क्रमांकावर असलेल्या लखनौ सुपर जायंट्सने १४ सामन्यांमध्ये ६ सामने जिंकले आणि ८ पराभूत झाले. त्यांचा -०.३७६ नेट रन रेट असून त्यांचेही १२ गुण आहेत.
सनरायझर्स हैदराबाद ६ व्या क्रमांकावर असून त्यांनी १४ सामन्यांमध्ये ६ विजय आणि ७ पराभव स्वीकारले. त्यांचा १ सामना रद्द झाला. त्यांचे -०.२४१ नेट रन रेट असून त्यांचे १३ गुण आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने १४ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले, तर ६ सामने पराभूत झाले, त्यांचा १ सामना रद्द झाला. त्यामुळे ते ०.०११ नेट रन रेट आणि १५ गुणांसह ५ व्या क्रमांकावर राहिले.
मुंबई इंडियन्सने १४ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आणि ६ सामने पराभूत झाले, त्यामुळे ते १.१४२ नेट रन रेटसह १६ गुण मिळवून चौथ्या क्रमांकावर राहिले. तसेच त्यांनी प्लेऑफमध्येही स्थान मिळवले.
गुजरात टायटन्सने १४ सामन्यांपैकी ९ विजय आणि ५ पराभव स्वीकारले. त्यांचा ०.२५४ नेट रन रेट असून त्यांचे १८ गुण आहेत. ते तिसऱ्या क्रमांकासह प्लेऑफसाठी पात्र ठरले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १४ सामन्यांमध्ये ९ विजय मिळवले, तसेच ४ पराभव आणि १ रद्द सामन्यासह १९ गुण मिळवले. त्यांचा ०.३०१ नेट रन रेट असून त्यांनी दुसरा क्रमांक मिळवत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले.
पहिल्या क्रमांकावर पंजाब किंग्स असून त्यांनी १४ सामन्यांपैकी ९ सामने जिंकले आणि ४ सामन्यात पराभव स्वीकारला. त्यांचा १ सामना रद्द झाला. त्यामुळे ०.३७२ नेट रन रेट आणि १९ गुणांसह त्यांनी अव्वल स्थान मिळवत प्लेऑफ गाठली.