Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेत २६ मे रोजी पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला जयपूरला झालेल्या सामन्यात ७ विकेट्सने पराभूत केले.
पण असे असले तरी या सामन्यादरम्यान मुंबईचा भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
सूर्यकुमारने ३९ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले.
या खेळीदरम्यान त्याने आयपीएल २०२५ मध्ये ६०० धावांचा टप्पा पार केला. त्याने १४ सामन्यात १६७.९७ च्या स्ट्राईक रेटने ६४० धावा केल्या आहेत.
त्यामुळे त्याने दुसऱ्यांदा आयपीएल हंगामात १६० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने ६०० धावा पूर्ण केल्या आहेत. याआधी २०२३ मध्ये त्याने असा कारनामा केला होता. यामुळे त्याने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.
ख्रिस गेलने २०११ आणि २०१२ या दोन वर्षी आयपीएलमध्ये १६० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने ६०० हून अधिक धावा केल्या होत्या.
केवळ गेल आणि सूर्यकुमार हे दोघेच आहे, ज्यांनी दोन आयपीएल हंगामात हा कारनामा केलाय.
एबी डिविलियर्सने २०१६ साली, रिषभ पंतने २०१८ साली आणि यशस्वी जैस्वालने २०२३ साली आयपीएल हंगामात १६० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने ६०० धावा पूर्ण केल्या होत्या.
सूर्यकुमारची ही आत्तापर्यंतची एका आयपीएल हंगामातील सर्वोत्तम कामगिरी देखील आहे. तसेच तो मुंबईकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे.