Shubham Banubakode
पंजाब किंग्ज संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉटिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रिकी पॉटिंग क्रिकेटच्या माध्यमातून मोठी कमाई करतात. ते विविध लीगमधील क्रिकेट संघांचेही प्रशिक्षक आहेत.
२०२० मध्ये रिकी पॉटिंग यांनी ‘पॉटिंग वाइन्स’ नावाचा स्वतःचा वाइन ब्रँड सुरू केला. मद्यव्यवसायातून ते कोट्यवधी रुपये कमावतात.
२०२३ मध्ये रिकी पॉटिंग यांनी त्यांचा वाईन ब्रँड भारतातही लाँच केला.
प्रसिद्ध वाइनमेकर बेन रिग्स आणि रिकी पॉन्टिंग हे व्यावसायिक भागीदार आहेत.
रिकी पॉटिंग ७ वर्षे दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक होते. २०२४ मध्ये त्यांना पंजाब किंग्जने करारबद्ध केलं.
रिकी पॉटिंग यांनी २००३ ते २०११ यादरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे.
रिकी पॉटिंगच्या नेतृत्वातच ऑस्ट्रेलियाने २००३ आणि २००७ ची विश्वचषक स्पर्धा जिंकली.
२०११ च्या विश्वचषक स्पर्धेतही रिकी पॉटिंग ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे कर्णधार होते. मात्र,त्यावेळी संघ उपांत्यपूर्व फेरीतच बाद झाला.
रिकी पॉटिंग यांनी १६८ कसोटी, ३७५ एकदिवसीय, १७ टी-२० आणि १० आयपीएल सामने खेळले आहेत.