Pranali Kodre
३ जून रोजी आयपीएल २०२५ स्पर्धेची सांगता झाली. त्यामुळे आता सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप १० खेळाडूंची यादी पाहा.
गुजरात टायनट्सच्या साई सुदर्शनने १५ सामन्यांत सर्वाधिक ७५९ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने ऑरेंज कॅपही जिंकली
मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने १६ सामन्यांत सर्वाधिक ७१७ धावा केल्या. तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीने १६ सामन्यांत ६५७ धावा केल्या.
गुजरात टायनट्सचा कर्णधार शुभमन गिल याने १५ सामन्यांत ६५० धावा केल्या.
लखनौ सुपर जायंट्सच्या मिचेल मार्शने १३ सामन्यांत ६२७ धावा करून चौथे स्थान पटकावले होते.
श्रेयस अय्यरने पंजाब किंग्सकडून १७ सामन्यांत ६०४ धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जैस्वालने ५५९ धावा केल्या.
प्रभसिमरन सिंगने पंजाब किंग्ससाठी १७ सामन्यांत ५४९ धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेल्या लोकेश राहुलने यंदा १३ सामन्यांत ५३९ धावा केल्या.
गुजरात टायटन्सच्या जॉस बटलरने १४ सामन्यांत ५३८ धावा कुटल्या, परंतु संघ एलिमिनेटरमध्ये बाहेर गेला.
लखनौ सुपर जायंट्सच्या निकोलस पूरनने १४ सामन्यांत ५२४ धावा केल्या आहेत.