Pranali Kodre
पंजाब किंग्सने आयपीएल २०२५ स्पर्धेत क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करताना काही विक्रमही केले आहे.
पंजाब किंग्ससमोर मुंबई इंडियन्सने २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग पंजाब किंग्सने १९ षटकात ५ विकेट्स गमावत २०७ धावा करत पूर्ण केला.
त्यामुळे पंजाब किंग्स पहिला संघ ठरला, ज्यांनी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करून सामना जिंकला.
यापूर्वी १८ वर्षात कधीही मुंबई इंडियन्सविरुद्ध कोणत्या संघाला २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करता आला नव्हता.
याशिवाय पंजाब किंग्सने केलेल्या २०४ धावांचा पाठलाग हा आयपीएल प्लेऑफमधील सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग देखील ठरला आहे.
तसेच पंजाब किंग्सने आयपीएलमध्ये ८ व्यांदा २०० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. हा देखील एक विक्रम आहे.