Shubham Banubakode
आयपीएल २०२५ मध्ये युवा भारतीय खेळाडूंनी सर्वांनाच प्रभावित केलं आहे.
यामध्ये विग्नेश पुथूरपासून तर १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीपर्यंत अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
या खेळाडूंना लवकरच भारतीय टी-२० संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
हे अनकॅप्ड खेळाडू कोण आहेत? कुणाला नेमकी संधी मिळू शकते, जाणून घेऊया.
मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू विग्नेश पूथूरने ५ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांना भारतीय टी-२० संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारने मुंबई इंडियन्सकडून ३ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या. तो भारतीय टी-२० संघासाठी प्रमुख दावेदारांपैकी एक आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा लेगस्पिनर विप्रज निगमने १० सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या. त्यालाही भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
यश दयालने आरसीबीकडून खेळताना ११ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या. यापूर्वी तो भारतीय संघात खेळला आहे. त्याला पुन्हा संधी मिळू शकते.
लखनौ सुपर जायंट्सचा फिरकीपटू दिग्वेश राठीने १० सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत. तो भारतीय टी-२० संघासाठी मजबूत दावेदार आहे.