Shubham Banubakode
विराट कोहलीला क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करण्यासाठी फिट राहणे आवश्यक आहे.
त्यासाठी त्याने स्वतःसाठी एक डाएट प्लॅन तयार केला आहे आणि त्याचे तो काटेकोरपणे पालन करतो.
विराट कोहलीने अनेक मुलाखतींमध्ये आपल्या डाएट प्लॅनबद्दल सांगितले आहे.
त्याच्या आहारात उकडलेल्या भाज्यांचा समावेश असतो. तो त्या भाज्यांवर लिंबाचा रस, मीठ आणि काळी मिरी टाकून खातो.
चटपटीत खाण्याची इच्छा झाल्यास तो ग्रिल्ड पदार्थ खाण्यास प्राधान्य देतो.
विराटच्या रोजच्या आहारात डाळ, क्विनोआची रोटी, मसालेविरहित भाज्या आणि सॅलड यांचा समावेश असतो.
चीट डेला तो राजमा किंवा छोले भटुरे खातो. आहाराबरोबरच तो व्यायामावरही लक्ष देतो आणि दररोज १ ते २ तास व्यायाम करतो.
विराटने काही दिवसांपूर्वी अंडी आणि डेअरी प्रॉडक्ट्स खाणे सोडले आहे.
तो आहारात साखर आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळतो. याशिवाय, तो फक्त ब्लॅक कॉफीच घेतो.