Swadesh Ghanekar
हैदराबादच्या अनिकेत वर्माने ७४ धावांची खेळी करून संघाला १६३ धावांपर्यंत पोहोचवले.
मिचेल स्टार्सने ३.४ षटकांत ३५ धावा देताना SRH च्या ५ फलंदाजांना माघारी पाठवले.
ओपनर फॅपने २७ चेंडूंत ५० धावा चोपताना जॅक फ्रेझर मॅकगर्कसह ( ३८) ८१ धावा जोडल्या.
मॅकगर्क व अभिषेक पोरेल ( ३४) यांनी धावांचा वेग कमी होऊ दिला नाही.
लोकेश राहुलने ५ चेंडूंत १५ धावा व त्रिस्तान स्तब्सने १४ चेंडूंत २१ धावांची खेळी केली.
हैदराबादने सामना गमावला असला तरी २५ वर्षीय झीशान अन्सारीने सर्वांचे लक्ष वेधले.
यूपी ट्वेंटी-२० लीगमध्ये त्याने १२ इनिंग्जमध्ये २४ विकेट्स घेतल्या होत्या.
हैदराबादसाठी पदार्पणाच्या सामन्यात ३ विकेट्स घेणारा झीशान हा पहिलाच गोलंदाज ठरला.