IPL 2026 Auction Most Expensive Players : आयपीएल २०२६ च्या लिलावात सर्वात महागडे ठरलेले खेळाडू; पाहा फक्त एका क्लिकवर!

Mayur Ratnaparkhe

कॅमेरॉन ग्रीन - (केकेआर)

ऑस्ट्रेलियन फलंदाज कॅमेरॉन ग्रीनला कोलकाता नाईट रायडर्सने २५ कोटी २० लाख रुपयांना खरेदी केले.

मथिशा पाथिराणा - (केकेआर)

केकेआरने पाथिराणाला १८ कोटी रुपयांना विकत घेतले, ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा श्रीलंकेचा खेळाडू बनला.

प्रशांत वीर - (सीएसके)

चेन्नई सुपर किंग्जने अनकॅप्ड खेळाडू प्रशांतला १४ कोटी २० लाख रुपयांना विकत घेतले, तर त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये होती.

कार्तिक शर्मा - (सीएसके)

चेन्नई सुपर किंग्जने कार्तिक शर्माला १४.२० कोटी रुपयांच्या बोलीसह त्यांच्या संघात समाविष्ट केले.

आकिब दार - (डीसी)

आकिब दार आयपीएल लिलावात विकल्या गेलेल्या महागड्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. दिल्ली कॅपिटल्सने त्याला ८.४० कोटींना विकत घेतले.

रवी बिश्नोई - (आरआर)

राजस्थान रॉयल्सने रवी बिश्नोईला ७ कोटी २० लाखांना विकत घेतले, त्याची मूळ किंमत २ कोटी होती.

व्यंकटेश अय्यर - (आरसीबी)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ च्या लिलावात व्यंकटेश अय्यरला विकत घेतले. यावेळी, व्यंकटेश अय्यरची आयपीएल किंमत ७ कोटी आहे.

Next : जॉर्डनचे क्राउन प्रिन्स अल हुसेन यांची संपत्ती, शिक्षण अन् बरच काही फक्त एका क्लिकवर

Jordan Crown Prince Hussein

|

esakal

येथे क्लिक करा