Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेत शनिवार, २५ एप्रिल हा दिवस विक्रमी ठरला. या दिवशी झालेल्या दोन्ही सामन्यात मिळून मोठे विक्रम झाले.
DC vs PBKS & RR vs SRH
Sakal
शनिवारी पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सने ६ विकेट्सने दिल्ली कॅपिटल्सला हरवलं.
Prabhsimran Singh - Priyansh Arya
Sakal
दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुल (नाबाद १५२) आणि नितीश राणा (९१) यांच्या खेळीच्या जोरावर २ बाद २६४ धावा केल्या, पण नंतर पंजाब किंग्सने प्रभसिमरन सिंग (७६) आणि श्रेयस अय्यर (नाबाद ७१) यांच्या खेळीमुळे १८.५ षटकात २६५ धावा करत विजय मिळवला.
Prabhsimran Singh - Priyansh Arya
Sakal
शनिवारी दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने ५ विकेट्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत केले.
Abhishek Sharma
Sakal
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशी (१०३) आणि ध्रुव जुरेल (५१) यांच्या खेळीमुळे ६ बाद २२८ धावा केल्या, पण ईशान किशन (७४) आणि अभिषेक शर्मा (५७) यांच्या खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने १८.३ षटकात २२९ धावा करत विजय मिळवला.
Ishan Kishan
Sakal
त्यामुळे आयपीएलमध्ये एकाच दिवसात तब्बल ९८६ धावा करण्यात आल्या. हा एका दिवसात सर्वाधिक धावा होण्याचा विक्रम आहे.
KL Rahul - Nitish Rana
Sakal
याशिवाय चारही संघांनी मिळून ५६ षटकार मारले. त्यामुळे आयपीएलमध्ये एका दिवसात मारण्यात आलेले हे सर्वाधिक षटकार आहेत.
Dhruv Jurel - Vaibhav Sooryavanshi
Sakal
याशिवाय चारही संघांकडून ८ खेळाडूंनी ५० हून अधिक धावांची खेळी केली, त्यामुळे आयपीएलमध्ये एका दिवसात झालेला हा देखील एक विक्रम आहे.
Dhruv Jurel - Shreyas Iyer
Sakal
याशिवाय केएल राहुलची नाबाद १५२ धावांची खेळी ही आयपीएलमधील भारतीय खेळाडूकडून करण्यात आलेली सर्वोच्च धावांची खेळी ठरली.
KL Rahul
Sakal
वैभव सूर्यवंशीने शतक करताना १२ षटकार मारले. त्यामुळे आयपीएलमध्ये एका डावात १२ षटकार मारणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.
Vaibhav Sooryavanshi
Sakal
MS Dhoni
Sakal