IPL 2026: नाशिकचा साहिल पारख आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यास सज्ज

Pranali Kodre

नाशिक ते दिल्ली

नाशिक ते दिल्ली... हा प्रवास १८ वर्षांच्या साहिलसाठी केवळ किलोमीटरचा नाही, तर अपार मेहनतीचा आहे. ही गोष्ट आहे नाशिकचा युवा डावखूरा बॅटर साहिल पाखरची, जो आता दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल खेळण्यास सज्ज झाला आहे.

Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals

|

Instagram

५ व्या वर्षी क्रिकेट प्रशिक्षणाला सुरुवात

वडिलांमुळे क्रिकेटची गोडी लागलेल्या साहिलने नाशिकमध्ये वयाच्या ५ व्या वर्षी क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.

Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals

|

Instagram

विविध स्थरावर पाडली छाप

त्यानंतर त्यानं त्याच्या मेहनतीनं आणि कौशल्याने विविध स्तरावर त्याची छाप उमटवली. शालेय, राज्यस्तरीय क्रिकेट खेळल्यानंतर त्याची निवड महाराष्ट्राच्या वयोगटातील संघांमध्येही अनेकदा झाली.

Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals

|

Instagram

१९ वर्षांखालील भारतीय संघाचा प्रतिनिधित्व

त्याला १९ वर्षांखालील भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. कोणत्याही स्तरावर क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारा नाशिकचा पहिलाच खेळाडू.

Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals

|

Instagram

अभ्यासातही हुशार

पण क्रिकेटचं मैदान गाजवत असतानाच साहिलने अभ्यासही मागे पडू दिला नाही. तो बोर्डाच्या परिक्षेतही उत्तम मार्कांनी पास झाला.

Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals

|

Instagram

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक

२०२४ मध्ये त्यानं १९ वर्षांखालील भारतीय संघासाठी वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७५ चेंडूंत १०९ धावांची स्फोटक खेळी करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals

|

Instagram

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

साहिलनं १९ वर्षांखालील विनू मंकड स्पर्धेत महाराष्ट्राचे कर्णधारपदही भूषवलं. त्यानंतर २०२५ मध्ये त्याने महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पणही केलंय.

Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals

|

Instagram

महाराष्ट्र प्रीमियर लीग

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतही साहिलने १७७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना नाशिक टायटन्सला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals

|

Instagram

दिग्गजांकडून शिकण्याची संधी

काही वर्षापूर्वी त्याला बंगळुरीतील बीसीसीआयच्या नॅशनल क्रिकेट ऍकेडमीत (NCA) झालेल्या शिबिरात भारताच्या स्टार खेळाडूंसोबत सरावाची संधीही मिळाली. आता त्याला आयपीएलमध्ये नामांकित खेळाडूंकडून शिकण्याची संधीही मिळणार आहे.

Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals

|

Instagram

तब्बल १९ वर्षे... विराट-धोनीलाही न जमलेला विक्रम आता रोहित शर्माच्या नावावर

Rohit Sharma Record | Mumbai Indians | IPL 2026

|

Sakal

येथे क्लिक करा