IPL ची ब्रँड व्हॅल्यू कोसळली; तरीही कोणती टीम ठरली सर्वात श्रीमंत?

Vinod Dengale

ब्रँड व्हॅल्यूत 20% घट


सरकारने रिअल-मनी गेमिंगच्या जाहिरातींवर बंदी घातल्याने IPL ची ब्रँड व्हॅल्यू 12 अब्ज डॉलरवरून घसरून 2025 मध्ये $9.6 अब्ज झाली आहे.

IPL Value 

|

Sakal

मुंबई इंडियन्स - $108 मिलियन

मुंबई इंडियन्सची आयपीएल ची सर्वात श्रीमंत फ्रँचाईजी बनली आहे. वॅल्यूमध्ये 9% घट असूनही 2024 मध्ये गमावलेली पहिली जागा यावर्षी पुन्हा मिळवली आहे.

MI

|

Sakal

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - $105 मिलियन

RCB ने 18 वर्षांनी पहिलं IPL जेतेपद पटकावल आणि थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. जेतेपद जिंकल्यानंतरही मागच्या वर्षीच्या तुलनेत व्हॅल्यूमध्ये 10% घट झाली आहे.

RCB

|

Sakal

चेन्नई सुपर किंग्स - $93 मिलियन

CSK ने या वर्षी इतिहासातील सर्वात खराब कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्या व्हॅल्यूमध्ये तब्बल 24% घसरण झाल्याने त्यांना पहिल्या स्थानावरून तिसऱ्यावर जावे लागले आहे.

CSK

|

Sakal

कोलकाता नाईट रायडर्स - $74 मिलियन

2024 च्या या विजेत्या संघाच्या व्हॅल्यूमध्ये 33% घसरण झाली तरी चौथ्या स्थानावर कायम आहे.

KKR

|

Sakal

गुजरात टायटन्स - $70 मिलियन

2025 मधील एकमेव व्हॅल्यूमध्ये वाढ होणारी टीम असून आठव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

Gujrat Titans 

|

Sakal

पंजाब किंग्ज - $66 मिलियन

2025 मधील उपविजेतेपदामुळे नवव्या स्थानावरून सहाव्यावर झेप घेतली आहे.

Panjab Kings 

|

Sakal

लखनऊ सुपर जायंट्स - $59 मिलियन

नवीन संघ बांधणी आणि स्टार खेळाडूंचा समावेश केल्याने संघ वॅल्यूमध्ये शेवटच्या स्थानावरून सातव्या आला आहे.

LSG

|

Sakal

दिल्ली कॅपिटल्स - $59 मिलियन

नेतृत्वातील बदल आणि खराब कामगिरीमुळे वॅल्यूमध्ये 26% घसरण होत DC संघ सातव्या वरून आठव्या स्थानावर गेला आहे.

DC

|

Sakal

सनरायझर्स हैदराबाद - $56 मिलियन

2024 चे उपविजेता संघ असतानाही 2025 मध्ये खराब कामगिरी केल्यामुळे वॅल्यूमध्ये तब्बल 34% घट झाली आहे.

SRH

|

Sakal

राजस्थान रॉयल्स - $53 मिलियन

पहिल्या आयपीएलचा विजेता संघ आज नेतृत्वातील गोंधळ आणि खराब कामगिरीमुळे वॅल्यूमध्ये शेवटच्या स्थानावर फेकला गेला आहे.

RR

|

Sakal

Smartphone 

|

Sakal

Smartphone : बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स हवेत? बघा 30,000 च्या आतील 2025 मधील बेस्ट 5G स्मार्टफोन्स