सकाळ डिजिटल टीम
IPL म्हणजे भारतीयांसाठी दिवाळी. या IPL मध्ये अनेक मोठे खेळाडू बनले, अनेक खेळाडूंनी अनेक संघ बदलले… पण काही क्रिकेटर्स आपल्या एकाच फ्रँचायझी साठी खूप काळ खेळले.
ipl teams
Sakal
2013 मध्ये राजस्थान रॉयल्स कडून पदार्पण केल्यानंतर पुन्हा 2018-2025 मध्ये या संघासाठी खेळला. या 11 वर्षांच्या काळात त्याने संघासाठी 127 सामने खेळले.
Sanju Samson
Sakal
भुवीने 2014 ते 2024 काळात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी 145 सामने खेळले. यात 2016 साली त्यांचा संघ चॅम्पियन झाला होता. यात त्याने सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती.
Bhuvaneshwar Kumar
Sakal
2011 ते 2021 तब्बल 11 वर्ष एबीडी RCB संघाची कमान होता. या 11 वर्षांत त्याने RCB साठी 156 सामने खेळले.
AB D
Sakal
मिस्टर IPL म्हणून ओळख असणारी रैनाने CSK संघासाठी 2008-21 या काळात त्याने 176 सामने खेळले. CSK ला 4 वेळा चॅम्पियन बनविण्यात त्याने मोठी भूमिका बजावली.
Suresh Raina
Sakal
मॉडर्न क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर म्हणून ओळख असलेल्या जाडेजाने CSK साठी 2012-25 काळात 189 सामने खेळले. मात्र 2026 साठी तो राजस्थान साठी खेळणार आहे.
Jadeja
Sakal
KKR चा स्पिन जादूगर आणि फ्रँचायझीसाठी मॅच-विनिंग स्पेल्स देणाऱ्या नारायण ने 2012 पासून आतापर्यंत KKR साठी 189 सामने खेळले आहेत.
Sunil Narine
Sakal
मुंबई इंडियन्सचा सर्वाधिक भरवश्याचा ऑलराउंडर आणि अनेक संकटातून टीमला बाहेर काढणारा फिनिशर पोलार्डने MI साठी 2010-22 या काळात 189 सामने खेळले.
K Pollard
Sakal
IPL चा सर्वात यशस्वी कर्णधार आणि हिटमॅन म्हणून ओळख असणाऱ्या रोहितने मुंबईसाठी 2011 पासून आतापर्यंत 227 सामने खेळले आहे. यात त्याच्या नेतृत्वात संघ 5 वेळा चॅम्पियन झाला.
Rohit Sharma
Sakal
कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने 2008 पासून आतापर्यंत संघासाठी 248 सामने खेळले आहेत. यात 5 वेळा संघ चॅम्पियन बनला आहे.
MS Dhoni
Sakal
IPL च्या सुरुवातीपासून आजपर्यंत फक्त एकाच संघासाठी खेळणारा एकमेव सुपरस्टार. क्रिकेटचा किंग म्हणून ओळख असणाऱ्या कोहलीने RCB साठी तब्बल 267 सामने खेळले आहे.
VIrat Kohali
Sakal
Best DIY Face Packs for Dry Skin i Winter
sakal