Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा सध्या १८ वा हंगाम सुरू आहे. या हंगामात २२ एप्रिलपर्यंत ४० सामने खेळून झाले आहेत.
दरम्यान, या सर्व १८ हंगामात खेळण्याचा मान मिळवणारे केवळ चार खेळाडू आहे, ज्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचाही समावेश होतो.
विराट आणि रोहित यांनी १८ हंगामात खेळताना अनेक विक्रम नावावर केले आहेत.
तथापि, एक असा विक्रम आहे, जो सध्या फक्त या दोघांनीच केलेला आहे.
तो विक्रम असा की आयपीएलमध्ये विजयी सामन्यांमध्ये मिळून ४००० पेक्षा अधिक धावा फक्त या दोघांच्या नाववार आहेत.
विराटने आयपीएलमध्ये १२५ विजयी सामन्यांमध्ये सर्वाधिक ४४९७ धावा केल्या आहेत, ज्यात ५ शतकांचाही समावेश आहे.
रोहितने आयपीएलमध्ये १३८ विजयी सामन्यांमध्ये ४०५५ धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा समावेशही आहे.
या दोघांच्या पाठोपाठ आयपीएलच्या विजयी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवन असून त्याने १११ विजयी सामन्यांमधअये ३९४५ धावा केल्या आहेत.
ही आकडेवारी २२ एप्रिल २०२५ पर्यंतची आहे. पुढे जसे सामने होतील, तशी आकडेवारी बदलू शकते.