BCCI च्या वार्षिक करारातून 'या' खेळाडूंना डच्चू

Pranali Kodre

बीसीसीआयचा करार

बीसीसीआयने २१ एप्रिल रोजी भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाच्या २०२४-२५ वार्षिक मानधन कराराची घोषणा केली आहे.

Team India | Sakal

कालावधी

या करारासाठी १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ हा कालावधी ग्राह्य धरण्यात आला आहे.

Team India | Sakal

३४ खेळाडूंना स्थान

या करारात चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये खेळाडूंना विभागण्यात आले असून एकूण ३४ खेळाडूंना हा करार मिळाला आहे.

Team India | Sakal

काहींचे पुनरागमन, तर काहींना डच्चू

श्रेयस अय्यर, इशान किशन या खेळाडूंचे वार्षिक करारात पुनरागमन झाले आहे, तर काही खेळाडूंना या करारातून वगळण्यात आले आहे.

Team India | Sakal

करारातून बाहेर झालेले ५ खेळाडू

गेल्यावर्षी कराराच्या यादीत असणारे, पण यंदा बीसीसीआयने करारातून बाहेर केलेल्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

Team India | Sakal

आर अश्विन

भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने गेल्यावर्षीच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असल्याने तो २०२४-२५ कराराचा भाग नाही.

R Ashwin Retirement | Sakal

आवेश खान

वेगवान गोलंदाज आवेश खान सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआयचा करार मिळालेला नाही. गेल्यावर्षी तो बीसीसीआयच्या करारात सी श्रेणीमध्ये होता.

Avesh Khan | Sakal

जितेश शर्मा

यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा गेल्यावर्षी बीसीसीआयच्या करारात सी श्रेणीमध्ये होता, पण यावेळी २०२४-२५ च्या करारातून त्याला बाहेर करण्यात आले आहे.

Jitesh Sharma | Sakal

केएस भरत

यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत हा देखील गेल्यावर्षी सी श्रेणीमध्ये होता. पण यावेळी त्याला २०२४-२५ च्या करारातून बीसीसीआयने बाहेर केले आहे.

KS Bharat | Sakal

शार्दुल ठाकूर

वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरही भारतीय संघाचा सध्या भाग नाही. त्यालाही २०२४-२५ च्या करारातून बीसीसीआयने बाहेर गेले आहे. तो गेल्यावर्षी सी श्रेणीमध्ये होता.

Shardul Thakur | Sakal

सर्वात कमी वयात IPL पदार्पण करणारे टॉप-५ खेळाडू

Vaibhav Suryavanshi | Sakal
येथे क्लिक करा