Pranali Kodre
१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने २०२५ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
आयपीएल २०२५ नंतर लगेचच वैभव १९ वर्षांखालील भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे.
वैभवने त्याचा हा इंग्लंड दौराही त्याच्या स्फोटक फलंदाजीने गाजवला आहे. त्याने आत्तापर्यंत ५ वनडे सामने एक कसोटी सामना १९ वर्षांखालील इंग्लंड संघाविरुद्ध खेळला आहे.
बीसीसीआयकडून १९ वर्षांखालील खेळाडूंना सामन्यांच्या प्रत्येक दिवसासाठी मॅच फी म्हणून २० हजार रुपये दिले जातात. ही फी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाच दिली जाते.
यानुसार वैभवने ५ वनडे सामने खेळले असल्याने त्याचे त्याला मॅच फी म्हणून १ लाख रुपये मिळाले आहेत. तसचे त्याने एक चार दिवसांचा कसोटी सामना खेळला, ज्याचे त्याला ८० हजार रुपये मिळाले आहे.
अद्याप १९ वर्षांखालील संघाचा चार दिवसीय कसोटी सामना खेळायचा आहे. म्हणजे त्या सामन्याचेही त्याला ८० हजार रुपये मिळू शकतात.
म्हणजेच वैभवला या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात २.६ लाख रुपये मिळणार आहेत.
वैभवला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना खरेदी केले होते. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याचे एकूण मालमत्ता २ कोटी आहे.
वैभवने १९ वर्षांखालील इंग्लंड विरुद्ध वनडेत ५ सामन्यांत ३५५ धावा चोपल्या, तर कसोटी सामन्यात ७० धावा केल्या आणि २ विकेट्स घेतल्या आहेत.