Pranali Kodre
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसात त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता.
त्याला कोलकाता उच्च न्यायालयाने पत्नी हसीन जहाँला १.५ लाख आणि मुलगी आयराला २.५ लाख असे दरमहा चार लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.
याचदरम्यान आता शमीने १७ जुलैला लेकीच्या वाढदिवसासाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
शमीची मुलगी आयराचा १७ जुलैला १० वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने शमीने तिच्यासोबतचे गोड फोटो शेअर केले आहेत. यातील काही फोटो तिच्या अगदीत बालपणाचे आहेत.
शमीने तिच्यासाठी भावनिक मेसेजही या प्रोस्टमध्ये लिहिला आहे. त्याने लिहिले, 'प्रिय मुली, मला आजही त्या सर्व रात्री आठवतात, जेव्हा आपण उशीरापर्यंत जागायचो, गप्पा मारायचो, हसायचो आणि विशेषत: तुझा डान्स.'
त्याने पुढे लिहिले, 'तू किती पटापट मोठी होत आहेस, हे खरंच वाटत नाही. तुझ्या आयुष्यात केवळ चांगल्याच गोष्टी घडाव्यात, हीच माझी प्रार्थना आहे. देव तुला नेहमी प्रेम, शांतता, आनंद आणि उत्तम आरोग्य देवो.'
शमीची मुलगी आई हसीन जहाँसोबत राहते. दरम्यान, बऱ्याचदा ती शमीलाही भेटत असल्याचे दिसते.