Vinod Dengale
सध्या IPO गुंतवणूक हा ट्रेंड बनला आहे. मात्र IPO गुंतवणूक करताना पुढील गोष्टींची काळजी घेण महत्त्वाच आहे.
कंपनी नेमकं काय करते, तिचा बिझनेस मॉडेल कसा आहे आणि भविष्यात वाढीची क्षमता किती आहे हे जाणून घ्या.
कंपनीचा DRHP पाहा. यात कंपनीची आर्थिक स्थिती, जोखीम, कर्ज आणि भविष्यातील योजना यांची सविस्तर माहिती दिलेली असते.
कंपनीचा मागील काही वर्षांचा नफा, तोटा, कर्ज आणि कॅश फ्लो तपासा. सतत तोटा करणाऱ्या किंवा जास्त कर्ज असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना जास्त काळजी घ्यावी.
IPO ची किंमत जास्त तर नाही ना हे तपासण्यासाठी त्या क्षेत्रातील इतर कंपन्यांशी तुलना करा. कधी कधी IPO खूप महाग असतो आणि लिस्टिंगनंतर भाव घसरू शकतो.
GMP हा फक्त बाजारातील अंदाज असतो, हमी नसते. GMP जास्त आहे म्हणून IPO नक्कीच नफा देईल असे नाही.
तुम्हाला लिस्टिंग गेनसाठी गुंतवणूक करायची आहे की दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे हे आधी ठरवा. दोन्हीसाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी लागतात.
बुल मार्केटमध्ये बहुतेक IPO चांगले प्रदर्शन करतात, तर बेअर मार्केटमध्ये लिस्टिंग कमकुवत होऊ शकते. त्यामुळे मार्केट ट्रेंड समजून गुंतवणूक करा.
IPO मधून उभे केलेले पैसे कंपनी कशासाठी वापरणार आहे कर्ज फेडण्यासाठी, व्यवसाय वाढीसाठी की इतर कारणांसाठी हे समजून घ्या.
Small SIP, Big Returns: ₹1000 Per Month Investment Calculation for 20 Years
eSakal