Saisimran Ghashi
आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. अशीच एक धाडसी महिला म्हणजे IPS संजुक्ता पराशर. जिने १५ महिन्यात १६ अतिरेक्यांचा खात्मा केला!
संजुक्ता पराशर ह्या आसाममधील. त्यांचे वडील सिंचन विभागात, तर आई आरोग्यसेवेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आणि खेळात रस घेणारी होती.
त्यांनी दिल्लीतील कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स आणि JNU मधून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात शिक्षण घेतलं. UPSC मध्ये देशात ८५ वा क्रमांक मिळवला.
त्यांच्याकडे आयएएसची संधी होती, पण तीने आयपीएस निवडली. त्या म्हणतात, “IPS हे एकमेव पद आहे जे तात्काळ न्याय देऊ शकतं.”
2014 मध्ये त्यांना आसाममध्ये पोस्टिंग मिळाली. बोडो अतिरेक्यांनी हैदोस घातलेला. संजुक्ता पहिली महिला अधिकारी होत्या ज्या तिथं पोलीस नेतृत्व करत होत्या.
सीआरपीएफ जवानांसह त्यांनी एके 47 घेतली आणि घनदाट जंगलात अतिरेक्यांविरोधात मोहीमा राबवल्या. त्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले, अनेकांना पकडलं.
१५ महिन्यांत संजुक्तानं १६ अतिरेक्यांना ठार मारलं आणि ६४ अतिरेक्यांना अटक केली. त्यांच्या नावानं अतिरेक्यांना भीती वाटू लागली.
सध्या संजुक्ता पराशर या आसाममध्ये IGP म्हणून कार्यरत आहे. विवाहित असून त्यांचा एक मुलगा आहे. पण अतिरेक्यांमध्ये अजूनही त्यांची दहशत आहे.