Saisimran Ghashi
शिवरायांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्यावर संकट कोसळलं, पण मराठ्यांचा लढा कायम राहिला. संभाजी महाराजांनी संघर्ष सुरू ठेवला, पण औरंगजेबाने त्यांना कैद करून क्रूरपणे ठार मारले.
राजाराम महाराजांनी दक्षिणेतील जिंजी किल्ला केंद्र करून स्वराज्याचा ध्वज उंचावला. संताजी-धनाजी यांसारख्या पराक्रमी सरदारांनी मुघलांशी झुंज चालू ठेवली.
१७०० मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा औरंगजेबाने समजलं की मराठेशाही संपली. पण ते त्याचं स्वप्न ठरलं.
शिवरायांच्या सूनबाई आणि राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई यांनी तख्तावर बसून स्वराज्याची सूत्रं हाती घेतली. त्या वेळी त्या केवळ २५ वर्षांच्या होत्या.
औरंगजेबाने "एक विधवा काय करेल?" असा अवहेलना करत तिला दुर्लक्षित केलं, पण तीच विधवा पुढे त्याची झोप उडवणारी ठरली.
ताराबाईंनी आपल्या मुलाचे दुसरे शिवाजी यांचे राज्याभिषेक करून त्यांच्या नावाने स्वराज्याचा कारभार सुरू केला.
स्वतः सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या असल्यामुळे युद्धकलेत त्या कुशल होत्या. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा प्रभावी वापर करून मुघलांना नेस्तनाबूत केलं.
ताराबाई राणीसाहेबांनी मुत्सद्दीपणे राजकारण, डावपेच, आणि रणकौशल्य यांचा संगम साधत एक-एक किल्ला परत जिंकला.
औरंगजेबाच्या मनात हीच भीती होती की "जर ताराबाईंनी मराठ्यांना पुन्हा लढण्यासाठी एकत्र केलं तर?" आणि ती भीती अखेर खरी ठरली.
१७०७ साली महाराणी ताराबाई आणि त्यांच्या मावळ्यांनी थकलेला अपयशी झालेला आणि अपमानित औरंगजेब मराठ्यांच्या भूमीतच शेवट केला.