Anuradha Vipat
इरा खानने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक गोष्टींचे खुलासे केले आहेत.
नुकत्याच एका मुलाखतीत इरा तिला झालेले आजार आणि तिच्यावर झालेले अत्याचाराबाबत मोकळेपणाने बोलली आहे
इराने सांगितलं की जवळपास साडे तीन वर्ष ती रोज रात्री रडायची आणि सतत झोपायची.
तसेच इराने पुढे सांगितले की,” ती खूप लहान होती तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते.
इराने पुढे सांगितले की,”पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. परंतु त्या घटनेने माझ्या मनावर खोलवर परिणाम केला होता. मी सहा वर्षांची असतानाच मला टीबी झाला होता.
इराने पुढे सांगितले की, ती अगदी लहान लहान गोष्टींसाठी रडू लागायची, तिला सतत वाईट आणि उदास वाटायचं. ती चार-चार दिवस जेवत नसे.
14 व्या वर्षी ती लैंगिक अत्याचाराची बळी ठरली असल्याचे धक्कादायक माहितीही तिने सांगितली.