इराणची अंडरग्राऊंड मिसाईल शहरं बघितली का?

संतोष कानडे

इराण

इराणने जमिनीखाली मोठे शस्त्रसाठे व क्षेपणास्त्र तळे बांधलेली आहेत. तिथे विविध प्रकारची बॅलिस्टिक व क्रूझ मिसाईल्स ठेवल्या जातात

लष्करी दल

ही तळे मुख्यतः Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) या इराणच्या शक्तिशाली लष्करी दलाच्या अख्त्यारित आहेत

अंडरग्राऊंड मिसाईल शहर

ही अंडरग्राऊंड मिसाईल शहरं डोंगराळ भागात किंवा जमिनीखाली खोल बोगद्यांमध्ये बांधलेली असतात, जेणेकरून हवाई हल्ल्यांपासून संरक्षण मिळेल

भुयारी मिसाईल

2015 साली IRGC ने अशा भुयारी मिसाईल तळांचे व्हिडिओ/छायाचित्रे प्रसिद्ध केली, ज्यामुळे मिसाईल सिटी हा शब्द चर्चेत आला

क्षेपणास्त्रे

या मिसाईल सिटीमध्ये Shahab-3, Sejjil आणि Fateh-110 सारखी मध्यम व लघुपल्ल्याची क्षेपणास्त्रे येथे तैनात आहेत

प्रतिबंधक

देशावर होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रतिबंधक ताकद निर्माण करणे हाच यामगचा उद्देश आहे

इराण

या तळांमधून अल्पावधीत मिसाईल्स डागता येतील, अशी रचना केली असल्याचा दावा इराणकडून केला जातो

इस्रायल

अमेरिका, इस्रायल आणि पाश्चिमात्य देशांनी या तळांबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर याकडे लक्ष असते

भुयारी तळे

इराणने अशी किती शहरे उभारली आहेत याची अधिकृत संख्या जाहीर केलेली नाही. विविध अहवालांनुसार देशभरात अनेक भुयारी तळे असू शकतात

भारताचा कोहिनूर हिरा सर्वात आधी इराणने पळवला होता

<strong>येथे क्लिक करा</strong>