बिर्याणी कुणाची? मुघलांची की इराण्यांची?

संतोष कानडे

बिर्याणी

बिर्याणी हा शब्दच मुली इराणी म्हणजे पर्शियन आहे. बिंरियान या धातूपासून या शब्दाची उत्पत्ती झाली.

बिंरियान

बिंरियान या शब्दाचा अर्थ तळलेले किंवा भाजलेले पदार्थ.. इराणमध्ये तांदूळ शिजवण्यापूर्वी तो तुपामध्ये तळून घेतला जात असे. त्यावरुन हे नाव पडले.

तैमूरलंग

१३९८ मध्ये जेव्हा तैमूरलंग याने भारतावर स्वारी केली तेव्हा त्याच्या सैन्यासोबत बिर्याणी भारतात आली.

जेवण

सैनिकांसाठी पौष्टीक आणि एकाच भांड्यात बनवणारे जेवण म्हणून बिर्याणी सोयीची होत गेली.

इतिहासकार

काही इतिहासकार म्हणतात, अरब व्यापारी जेव्हा दक्षिण भारताच्या मलबार किनाऱ्यावर दाखल झाले तेव्हाच त्यांनी बिर्याणी आणली.

मुघल

असे असले तरी मुघलांनी बिर्याणीला शाही स्वरुप दिलं. त्यांनी भारतीय मसाले आणि इराणची पुलाव बनवण्याची पद्धत एकत्र केली.

मसाल्यांचा सुगंध

बिर्याणीला दम देण्याची पद्धत मुघलांनी रुढ केली. यामुळे मसाल्यांचा सुगंध तांदळाच्या प्रत्येक कणामध्ये उतरु लागला.

इराणी पुलाव

इराणी पुलाव हा कमी तिखट आणि सुगंधी होता. मुघलांनी त्यात भारतातील केशर, लवंग, वेलची, तिखट मसाले आणि दालचिनी घातली.

झणझणीत

त्यानंतर मग इराणी बिर्याणीचं रुपांतर झणझणीत भारतीय बिर्याणीमध्ये झालं. पुढे भारताच्या वेगवेगळ्या भागात निरनिराळ्या बिर्याणी तयार झाल्या.

हैदराबादी

भारतामध्ये लखनवी, हैदराबादी, कोलकाती या बिर्याणी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात बीडची एक वेगळीच बिर्याणी प्रसिद्ध आहे.

वाघाच्या लघवीची जंगलाला असते दहशत; देतो 'हे' 5 इशारे

<strong>येथे क्लिक करा</strong>