संतोष कानडे
नॉनव्हेज म्हणजे मांसाहाराबाबत आयुर्वेदात अत्यंत सविस्तर आणि शास्त्रीय पद्धतीने माहिती दिलेली आहे.
आयुर्वेद मांसाहाराला पूर्णपणे निषिद्ध मानत नाही. मात्र कधी खावे, किती खावे, कोणी खावे, कसे खावे.. याबाबत माहिती दिली आहे.
प्राण्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणांनुसार मांसाचे ८ प्रकार सांगितलेले आहेत. त्यात मुख्य दोन भाग आहेत. एक जांगल मांस आणि दुसरा आनूप मांस.
जांगल मांस म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी आणि आनूप मांस म्हणजे पाण्यात किंवा दलदलीच्या ठिकाणी राहणारे प्राणी.
मांसाहारामुळे शरीरात मांस धातू वाढवण्यास उत्तम आहे. यामुळे शरीरातील वाढलेला वात दोष कमी होतो.
आजारपणानंतर अशक्तपणा आला असेल तर आयुर्वेदात मांस रसाचा उल्लेख आहे. म्हणजे थोडक्यात मटण सूप.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, पचनशक्ती चांगली असेल तरच मांसाहार करावा. शिळे, वाळवलेले, कुजलेले किंवा आजारी प्राण्यांचे मांस विषासमान मानले आहे.
मासे आणि दूध, मध आणि मांस हे विरुद्ध आहार आहेत. आयुर्वेदात हे निषिद्ध मानले जातात. एकूणच मांसाहा हा मसालेदार नसावा.
कोंबडीचे मांस हे शुक्रधातू वाढवणारे आणि वात कमी करणारे असते. तर बकरीचे मांस हे मानवी शरीसासाठी मिळतेजुळते मानले जाते.
मासे मात्र कफ आणि पित्त वाढवणारे असतात, त्यामुळे प्रमाणात खावेत, असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे.
Raw onion Side Effects who should avoid
Sakal