सूरज यादव
अमेरिका-इराण संघर्षामध्ये इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत सागरी सुरुंग पेरले असून, त्याचा जास्तीत जास्त फटका अमेरिकेच्या आणि इस्त्राईलच्या जहाजांना बसेल, असा इराणचा दावा आहे.
iran minelayer
Esakal
इराणच्या 'माइनलेयर्स' म्हणजेच सागरी सुरुंग जहाजांचा नाश केला आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. इराणचे १०० टक्के लष्करी सामर्थ्य नष्ट केल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय.
iran minelayer
Esakal
इराणची याबाबतची क्षमता किती आहे, याचे आकडे अधिकृतपणे कधीही जाहीर झाले नाहीत पण; अनेक अहवालांनुसार इराणने समुद्रात २,००० ते ६,००० सागरी सुरुंग पेरले आहेत. .
iran minelayer
Esakal
इराणकडे माइन लेइंग (पेरण्याची क्षमता) आणि माइन स्टॉक्स (साठा) दोन्ही आहेत. इराणने अनेक वर्षांपासून तत्कालीन सोव्हिएत रशियासह पाश्चात्त्य देशांसोबत या सुरुंगांसाठी करार केले होते.
iran minelayer
Esakal
विविध संरक्षणविषयक अहवालांनुसार, इराणने ईएम-५२ रॉकेट प्रोपेल्ड माइन्स खरेदी केल्या आहेत. चीनकडून असे अनेक स्फोटके घेतल्याचेही म्हटले जाते.
iran minelayer
Esakal
अमेरिकी तज्ज्ञांच्या मते, इराणच्या शस्त्रसाठ्यात किमान २,००० पेक्षा जास्त समुद्री सुरुंग असून, रशिया, चीन आणि उत्तर कोरियाकडून इराणने ते मिळवले आहेत.
iran minelayer
Esakal
तज्ज्ञांच्या मतानुसार, इराण तेल जहाजांवरील हल्ल्यात समुद्री सुरुंगांचा वापर करतो. पहिल्या महायुद्धापासून अशा सुरुंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आला आहे.
iran minelayer
Esakal
सागरी सुरुंगांमुळे इराणला युद्धात आघाडी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. क्रूझ क्षेपणास्त्रांच्या तुलनेत या समुद्री सुरुंगांचा वापर अधिक सोपा असतो. त्यांची तैनातीही सहज करता येते.
iran minelayer
Esakal
इराणची मोठी समस्या म्हणजे त्याच्याकडे 'ईएम-५२' सुरुंग पेरणारी वाहने पुरेशी नाहीत. त्याच्याकडे फक्त त्यासाठीच्या तीनच पाणबुड्या आहेत. त्या समुद्रात शक्तिशाली सुरुंग पेरू शकतात.
iran minelayer
Esakal
इराण छोट्या बोटींच्या मदतीने सुरुंग पेरू शकतो. मात्र, हे यशस्वी होईल की नाही याबाबत खात्री देता येत नाही. सागरी सुरुंगांबाबतची माहिती इराणने कायमच गुप्त ठेवली असल्याचे चित्र आहे.
iran minelayer
Esakal
Hydroponics Cannabis
Esakal