सकाळ डिजिटल टीम
ना मातीची गरज, ना सूर्यप्रकाशाची आवश्यकता, एसीची व्यवस्था असलेल्या बंद खोलीत जोमात उगवणाऱ्या 'हायड्रोपोनिक गांजाने' कोल्हापुरात 'एन्ट्री' केल्याचे राजारामपुरी पोलिसांच्या कारवाईने उघड झाले. Esakal
Hydroponics Cannabis
Esakal
एका ग्रॅमला तब्बल १० हजार रुपये मोजणारे 'शौकिन' कोल्हापुरातही असल्याचे आता समोर आले. एक कोटी रुपये किलोने विक्री याची विक्री होते.
Hydroponics Cannabis
Esakal
'हायडोपोनिक' गांजाची इंडोनेशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांसारख्या देशांतूनही याची आयात केली जात आहे.
Hydroponics Cannabis
Esakal
'कोकोपिट' (नारळाच्या शेंड्यांचा चुरा) किंवा पाण्यात पोषक द्रव्ये मिसळून याची लागवड केली जाते. त्याखाली वाळू किंवा थर्माकोलचा वापर केला जातो.
Hydroponics Cannabis
Esakal
बंद आणि वातानुकूलित खोलीत उगवलेला गांजा कमी वेळेत उत्पादित होत असून, त्याची नशाही तीव्र असल्याने मागणी वाढल्याचे बोलले जाते.
Hydroponics Cannabis
Esakal
मातीचा वापर न करता केवळ पाण्यातून पोषक तत्त्वे पुरवून केल्या जाणाऱ्या आधुनिक शेतीला 'हायड्रोपोनिक शेती' म्हटले जाते.
Hydroponics Cannabis
Esakal
पारंपरिक शेतीच्या तुलनेत ९० टक्के कमी पाणी लागत असल्याने खर्चही कमी होतो. थेट त्यांच्या मुळाशी पोषक तत्त्वे दिल्यास त्या पिकांची वाढ वेगाने होते.
Hydroponics Cannabis
Esakal
LPG invention history
ESakal