बाळकृष्ण मधाळे
तृतीयपंथी समाजात अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि पारंपरिक प्रथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची प्रथा म्हणजे, भगवान इरावण यांच्याशी एका रात्रीसाठी केले जाणारे प्रतीकात्मक लग्न.
Why Do Transgender Women Marry Iravan for One Night?
esakal
तृतीयपंथी समुदाय भगवान इरावण यांना आपले कुलदैवत मानतो.
Why Do Transgender Women Marry Iravan for One Night?
esakal
परंपरेनुसार, दरवर्षी विशेष धार्मिक सोहळ्यात तृतीयपंथी इरावणाशी विवाह करतात. मात्र, हा विवाह फक्त एका रात्रीपुरताच असतो. दुसऱ्या दिवशी इरावणाच्या बलिदानाची आठवण म्हणून विधवांप्रमाणे शोक व्यक्त करण्याची प्रथा पाळली जाते.
Why Do Transgender Women Marry Iravan for One Night?
esakal
पौराणिक कथेनुसार, इरावण हे पांडवांपैकी अर्जुन यांचे पुत्र होते. महाभारत या महाकाव्यानुसार, कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी पांडवांनी विजयासाठी देवी कालीची पूजा केली. या पूजेसाठी राजकुमाराचे बलिदान आवश्यक असल्याचे सांगितले गेले.
Why Do Transgender Women Marry Iravan for One Night?
esakal
या वेळी इरावण यांनी स्वतःचे बलिदान देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यांनी एक अट ठेवली, बलिदानापूर्वी त्यांना विवाह करायचा होता. आता प्रश्न निर्माण झाला की, एका दिवसासाठी लग्न करून दुसऱ्या दिवशी विधवा होण्यास कोण तयार होईल?
Why Do Transgender Women Marry Iravan for One Night?
esakal
अशा वेळी श्रीकृष्ण यांनी मोहिनीचे रूप धारण केले आणि इरावणशी विवाह केला. दुसऱ्या दिवशी इरावणाचे बलिदान झाल्यानंतर श्रीकृष्णांनी विधवेच्या रूपात शोक व्यक्त केला.
Why Do Transgender Women Marry Iravan for One Night?
esakal
या घटनेपासून तृतीयपंथी समाज इरावणाला आपला देव मानतो. त्या स्मरणार्थ ते प्रतीकात्मक विवाह करतात आणि दुसऱ्या दिवशी विधवांसारखा शोक पाळतात.
Why Do Transgender Women Marry Iravan for One Night?
esakal
ही परंपरा श्रद्धा, त्याग आणि पौराणिक कथांशी जोडलेली एक अद्वितीय सांस्कृतिक परंपरा मानली जाते.
Why Do Transgender Women Marry Iravan for One Night?
esakal
How Long Can a Scorpion Live Without Food?
esakal