Anuradha Vipat
बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वात झळकलेली ‘परदेसी गर्ल’ इरिना रुडाकोवा नुकतीच चर्चेत आली आहे.
इरिनानं सोशल मीडियावर लावणी शिकतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
गोव्यात पार पडणाऱ्या इफ्फी ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४’ मध्ये इरिनाने हजेरी लावली आहे.
येथेच इरिना लावणी कलाकारांसह काही स्टेप्स शिकताना दिसत आहे.
इरिना ‘खेळताना रंग बाई होळीचा’ या लावणीवर डान्स करत आहे.
इरिनाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर चाहत्यांनी सुंदर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.