Aarti Badade
गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर, फक्त सर्जनच नाही, तर फिजिओथेरपिस्ट हा तुमचा खरा साथीदार असतो.
शस्त्रक्रियेनंतर नुसतं झोपून राहायचं नाही, तर फिजिओथेरपिस्टच्या मदतीने लगेच हालचाली सुरू कराव्या लागतात.
बसण्यासाठी किंवा जिने चढण्यासाठी गुडघे पूर्ण वाकले पाहिजेत. यासाठी दररोज विशिष्ट व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.
शस्त्रक्रियेनंतर स्नायू कमकुवत होतात. थेराबँड आणि वजन वापरून त्यांची ताकद वाढवणे आवश्यक आहे.
सुरुवातीला वॉकर वापरून, हळूहळू गर्दीत, उंच पायऱ्यांवर आणि ओबडधोबड रस्त्यांवर चालण्याचा सराव जमला पाहिजे.
वर्षानुवर्षे दुखत असल्यामुळे पायाचा तोल बिघडतो. यासाठी खास बॅलन्सचे व्यायाम करणे गरजेचे आहे.
वयोवृद्धांना वॉकरशिवाय चालण्यासाठी जरा जास्त वेळ लागू शकतो. यासाठी संयम आणि सराव महत्त्वाचा आहे.
कधीकधी पायाला बाक येणे किंवा नसांवर ताण येणे अशा गुंतागुंती होऊ शकतात. अशावेळी फिजिओथेरपीवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.