Aarti Badade
हिमोग्लोबिनची पातळी सामान्य असेल तर शरीरात लोहाची कमतरता नाही. पण तज्ज्ञांच्या मते, कमी हिमोग्लोबिन हा लोहाच्या कमतरतेचा अंतिम टप्पा आहे.
Iron deficiency symptoms
Sakal
लोहाचे काम केवळ रक्त तयार करणे नाही, प्रत्येक भागाला ऑक्सिजन पोहोचवणे हे आहे. कमतरतेमुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, हृदय आणि मेंदू दोन्ही कमकुवत होऊ शकतात.
Iron deficiency symptoms
Sakal
पुरेशी झोप घेऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल तर हे लोहाच्या कमतरतेचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. यामुळे स्नायू देखील कमकुवत होतात.
Iron deficiency symptoms
Sakal
पायऱ्या चढल्यानंतर छातीत धडधडणे सुरू होत असेल, तर सावध व्हा. शरीराला कमी ऑक्सिजन मिळाल्यामुळे हृदयाला रक्ताभिसरणासाठी जास्त कष्ट करावे लागतात.
Iron deficiency symptoms
Sakal
मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा कार्यक्षमता मंदावते. कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करताना अडथळा किंवा कामात मन न लागणे, मानसिक परिणाम आहेत.
Iron deficiency symptoms
Sakal
शरीराला जेव्हा लोहाअभावी ऊर्जा मिळत नाही, तेव्हा मेंदू त्वरित ऊर्जेसाठी गोड पदार्थ खाण्याचे संकेत देतो. तर ते लोहाच्या कमतरतेमुळे असू शकते.
Iron deficiency symptoms
Sakal
तोंडाचे कोपरे फुटणे, जिभेवर सतत जळजळ होणे आणि नखे कमकुवत होणे ही स्पष्ट शारीरिक लक्षणे आहेत. महिलांमध्ये मासिक पाळीनंतर दीर्घकाळ अशक्तपणा जाणवणे लक्षण आहे.
Iron deficiency symptoms
Sakal
हिमोग्लोबिन चेक करून थांबू नका. शरीरातील लोहाचा खरा साठा तपासण्यासाठी फेरिटिन टेस्ट करणे आवश्यक आहे. वेळीच निदान झाल्यास हृदय आणि मेंदूचे कायमचे नुकसान टाळता येते.
Iron deficiency symptoms
Sakal
Ayurvedic Home Remedy Digestion Cumin-Ajwain-Fennel
Sakal