Aarti Badade
गाढ आणि शांत झोप आपल्या शरीराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असते. दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ती महत्त्वाची आहे.
काही लोक झोपेत जोरात घोरतात, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. हे केवळ सवय नसून आरोग्याशी संबंधित समस्या असू शकते.
कधी कधी अनेक औषधं घेऊनही घोरण्याची समस्या कमी होत नाही. अशावेळी त्यामागचं मूळ कारण शोधणं गरजेचं आहे.
तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास घोरण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे झोपेत अडथळा, झोपेचा त्रास, थकवा यांसारख्या समस्या देखील होऊ शकतात.
व्हिटॅमिन डीसाठी आहारात घ्या सॅल्मन मासे,अंडी,लाल मांस,मशरूम,काजू आणि बिया
पालक, काळे, मेथी, भोपळा यासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्येही भरपूर व्हिटॅमिन डी असते.
घोरणं अनेक कारणांमुळे होऊ शकतं. त्यामुळे कोणताही उपाय सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
घोरणं हे फक्त त्रासदायक आवाज नाही, तर शरीरातील पोषण कमतरतेचं लक्षण असू शकतं. व्हिटॅमिन डीचा पुरवठा वाढवा आणि झोपेचा दर्जा सुधारा!