Aarti Badade
राग येणे ही एक सामान्य आणि नैसर्गिक भावना आहे, परंतु तो किती वेळ टिकतो आणि कशा प्रकारे व्यक्त केला जातो, यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात.
सतत राग केल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार, डोकेदुखी आणि झोपेचे विकार यांसारखे शारीरिक त्रास निर्माण होऊ शकतात.
रागामुळे तणाव, नैराश्य, चिडचिड आणि मानसिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता असते.
राग व्यवस्थापनासाठी ध्यान, मेडिटेशन, श्वासोच्छ्वास तंत्रे आणि वेळेवर स्वतःला शांत ठेवण्याचे सराव उपयुक्त ठरतात.
रागाला आत न ठेवता योग्य शब्दात आणि वेळेत मांडल्यास नातेसंबंध बिघडण्यापासून वाचतात.
जर स्वतःच्या पद्धतीने राग नियंत्रित करता येत नसेल, तर समुपदेशकांची किंवा तज्ज्ञांची मदत घेणे हे शहाणपणाचे ठरते.
राग व्यक्त करणे चुकीचे नाही, पण त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुरक्षित राहते.