Aarti Badade
सध्या इंटरनेटवर चिया बियांचे पाणी पिणे खूप ट्रेंडिंग आहे… पण हे खरंच आरोग्यदायी आहे का?
सकाळी चिया बियाण्यांचे पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि पचन सुधारते.
संशोधनानुसार चिया बिया त्यांच्या वजनाच्या १२ पट पाणी शोषतात. यामुळे शरीर हायड्रेट राहतं.
भिजवलेली चिया बिया सहज पचतात आणि पोषण मिळते.
चिया बियात ओमेगा-३, फायबर, आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात – त्यामुळे पचनासाठी फायदेशीर.
फायबरमुळे साखरेचे प्रमाण आणि कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
भिजवलेली चिया बिया पोट फुगण्याची समस्या कमी करतात.
८०० पेक्षा अधिक तरुणांवर केलेल्या अभ्यासात कंबर कमी झाली, जास्त वजन कमी न करता.
चिया बियात क्वेरसेटिन आणि क्लोरोजेनिक अॅसिड असतात – जे शरीरातील सूज कमी करतात.
चिया बियाण्यांचे पाणी हे फक्त ट्रेंड नाही – ते आरोग्यासाठी खरोखर फायदेशीर आहे… पण रोजच्या आहारात समतोलातच!