सकाळ डिजिटल टीम
अनेक लोक हे रात्रीच्या जेवनात कांद खातात पण, रात्री कांदा खाणे आरोग्याठी योग्य आहे का? रात्री कादा खाल्यास आरोग्यावर कोणते परीणाम होवू शकतात जाणून घ्या.
कच्च्या कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे काही लोकांना पचायला जड जाऊ शकते. यामुळे रात्रीच्या वेळी कांदा खाल्यास पोटाचे आजार होऊ शकतत.
कांदा खाल्ल्याने अनेकांना गॅस, पोट फुगणे आणि ॲसिडिटीचा त्रास होतो. रात्री झोपताना हे त्रास वाढू शकतात आणि त्यामुळे झोपमोड होऊ शकते.
कांदा खाल्ल्याने पोटातील ॲसिडचे उत्पादन वाढते. रात्री झोपल्यावर हे ॲसिड अन्ननलिकेत परत येण्याची शक्यता असते, ज्यामुळे छातीत जळजळ (ॲसिड रिफ्लक्स) होऊ शकते.
पचनाच्या समस्यांमुळे किंवा छातीत जळजळीमुळे झोप शांत लागत नाही. यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवू शकतो.
कांद्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि सेलेनियम रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. जर तुम्हाला पचनाचा त्रास होत नसेल, तर हे फायदे मिळू शकतात.
कच्च्या कांद्यापेक्षा शिजवलेला कांदा पचायला सोपा असतो. जर तुम्हाला रात्री कांदा खायचा असेल, तर तो शिजवून किंवा भाजीच्या रूपात तुम्ही खावू शकतात.
कांद्यामध्ये असलेले काही घटक रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेहींसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
ज्यांना पचनाचा त्रास, ॲसिडिटी किंवा इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) सारख्या समस्या आहेत, त्यांनी रात्री कांदा खाणे टाळावे.