अंजीर खरंच फळ आहे का?

Aarti Badade

अंजीर खरंच फळ आहे की फुलांचा समूह?

चवीला गोड आणि दिसायला आकर्षक असलेले अंजीर वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने एक अनोखी रचना असलेले फळ आहे.

Interesting Facts About Figs

|

Sakal

अंजिराचं शास्त्रीय नाव काय?

अंजिराचं शास्त्रीय नाव Ficus carica असून त्याचा समावेश मोरेसी या वनस्पती कुळात होतो, ज्यात वड, पिंपळ आणि उंबर यांचाही समावेश आहे.

Interesting Facts About Figs

|

Sakal

फळाच्या आत दडलेली असतात असंख्य फुलं!

आपल्याला फळ वाटणाऱ्या अंजिराच्या आतील मांसल भागावर असंख्य लहान फुलं असतात, त्यामुळे त्याला सायकॉनियम प्रकारची रचना म्हणतात.

Interesting Facts About Figs

|

Sakal

गांधीलमाशीशी आहे खास नातं

अंजिराच्या काही प्रजातींमध्ये विशिष्ट गांधीलमाशी फळाच्या टोकावरील छोट्या छिद्रातून आत प्रवेश करून परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण करते.

Interesting Facts About Figs

|

Sakal

हजारो वर्षांचा आहे अंजिराचा इतिहास

जॉर्डनमधील गिलगाल येथे सुमारे ११ हजार वर्षांपूर्वीचे अंजिराचे अवशेष सापडले असून, प्राचीन इजिप्त, ग्रीक आणि रोमन संस्कृतींमध्येही त्याचा वापर होत असे.

Interesting Facts About Figs

| Sakal

अंजीर आरोग्यासाठी किती फायदेशीर?

अंजिरामध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पचन आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

Interesting Facts About Figs

| Sakal

पुणे जिल्ह्यातही होते अंजिराची लागवड

महाराष्ट्रातील पुणे जिल्हा अंजीर उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, ताज्या आणि सुक्या अंजिरासह त्यापासून बनणाऱ्या पदार्थांनाही बाजारात मागणी आहे.

Interesting Facts About Figs

| Sakal

अनारशाच्या पिठात कोणते फळ घालतात?

Fruit Added to Anarsa Dough

|

Sakal

येथे क्लिक करा